Shreeganesh Sabhagruha

हिंदू विवाह हा वेदकाळापासून चालत आलेला आहे. 'अनंता 'वै वेदा:' म्हणजे वेद अनादी आहेत. जी गोष्ट प्र चीन आहे, ती जगन्मान्य आहे. ब्रह्मदेवाने वेदाची रचना पुरूषसूक्तामध्ये केली आहे. वेदांमध्ये प्रत्येक मानवावर १६ संस्कार केले जा वेत असे म्हटले आहे. त्यातील विवाह हा १५ वा संस्कार आहे. विवाह ह्या शब्दाची व्युत्पत्तीवि + वह अशी आहे. विशिष्ट मार्गाचे जीवन, कुळ, समाज वाहून नेणे असा याचा अर्थ आहे. सहधर्माचरण, सहनशीलता, संयम, सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह विवाह हा हिंदूंचा 'संस्कार' आहे, 'करार' नाही. त्यामुळे विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रद्धेचेही बरेच वरचे स्थान आहे. सांस्कृतिक पातळीवर विवाहबंधन हे अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक विधिंबरोबरच एक 'कार्य' या दृष्टीनेही समारंभप्रिय लोक लग्नाकडे खूप हौशीने पहातात. मराठी लग्नाचे मूळ महत्वाचे धार्मिक विधी व त्यामागची विचारपरंपरा यांची माहिती या विभागात दिलेली आहे.

भारतीय विवाहकायद्यानुसार लग्नासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच कायद्यानुसार विवाह संपन्न झाल्यानंतर वि वाहनोंदणीही बंधनकारक आहे. विवाहनोंदणी कलेक्टर कचेरीत केली जाते. हल्ली मुले मुली यांची मैत्री ब याच अंशी समाजमान्य झाल्यामुळे ओळखीतून प्रेमविवाह होणे ही गोष्ट काही नवीन राहिली नाही. तरीही वडिलधाऱ्यांनी पाहून पसंत केलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याची पद्धतच मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. लग्न जुळविण्यासाठी वधू वर सूचक मंडळे व तत्संबंधीची मासिके, वृत्तपत्रातील जाहिराती यांनी ‘स्थळ’ संशोधनाचे काम पुष्कळ सोपे केले आहे. यासंबंधीच्या अनेक वेबसाइट्सही निघाल्या आहेत. लग्न बधींसाठी लागणारी ‘मंगल कार्यालये’ ही भटजींपासून ते जेवणावळींपर्यंतच्या सर्व सुविधा पुरवितात. पुणे शहर तर मंगल कार्यालयांसाठी फारच प्रसिद्ध आहे.
लग्न ठरविताना ‘पत्रिका’ अथवा ‘जन्मकुंडली’ पाहून वर व वधू यांची पत्रिका जुळणे या वर लोकांचा कमी अधिक प्रमाणवर विश्वास असतो. पत्रिका जुळली की त्यांचे वैवाहिक जीवन सुखकर व संपन्न होईल असा विश्वास असतो. पत्रिका जुळली की तेथून लग्नाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. पत्रिका जुळल्यास ‘मुलगी पहाण्याचा’ कार्यक्रम होतो व मुलगा आणि मुलगी यांच्या पसंतीसंबंधीची एकवाक्यता झाल्यावर दोन्ही व्यक्तींच्या कुटुंबियांकडून एकत्र येऊन ‘साखरपुडा’ हा विधी केला जातो.

पत्रिका जुळल्या आणि नवरा नवरींची एकमेकांची पसंती झाली की वधू वरांच्या कुटुंबीयाकडील लोक लग्न 'पक्के' करण्यासाठी हा विधी करतात. पूर्वी या विधीला 'कुंकू ला वणे' म्हणत. अगदी पूर्वी ह्या विधीला अजिबात महत्व नव्हते. परंतु त्याविषयी धार्मिक वधी व मंत्र मात्र अस्तित्वात आहेत. प्रथम वराचा पिता चार नातेवाईक व प्रतिष्ठित लोकांना घेऊन कन्येच्या पित्याकडे जातो व आपल्या मुलासाठी त्यांच्या कन्येला वि वाहाची मागणी घालतो. कन्येचा पिता घरच्यांची व मुलीची संमती घेऊन होकार कळ वतो. सर्वांच्यादेखत वरपिता व वधूपिता हा विवाह निश्चित झाल्याचे जाहीर करतात. ह्याला वाङनिश्चय म्हणतात. म्हणजेच या विवाहाचा तोंडी व्यवहार पक्का झाला. हा विधी काही ठिकाणी गुरुजींमार्फत संस्कृतमधून होतो.सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह विवाह हा हिंदूंचा 'संस्कार' आहे, 'करार' नाही. त्यामुळे विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रद्धेचेही बरेच वरचे स्थान आहे. सांस्कृतिक पातळीवर विवाहबंधन हे अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक विधिंबरोबरच एक 'कार्य' या दृष्टीनेही समारंभप्रिय लोक लग्नाकडे खूप हौशीने पहातात. मराठी लग्नाचे मूळ महत्वाचे धार्मिक विधी व त्यामागची विचारपरंपरा यांची माहिती या विभागात दिलेली आहे.

त्यानंतर लगेच साखरपुडा हा विधी केला जातो. वरपिता मुलीला कुंकू लावून साडी चोळी व नारळ देतो आणि या शुभप्रसंगी तोंड गोड करण्यासाठी साखर देतो. म्हणून या विधीला ‘साखरपुडा’ असे नाव प्राप्त झाले आहे. हल्ली साखरेऐवजी पेढयाचा पुडा मुलीला देण्याची पद्धत आहे. तसेच ऐपतीनुसार मुलीला सोन्या हिऱ्याचा दागिनाही देतात. बहुधा हा दागिना म्हणजे अंगठीच असते. मुलीचा पिताही भावी जावयाची पूजा करून त्याला पोषाख देतो व सोन्याची किंवा खड्याची अंगठी देतो. हल्ली मुलगा मुलगी यांनीच एकमेकांना अंगठी घालण्याची पद्धत प्रचलीत आहे. या समारंभानंतर चहा फराळाचे आदरातिथ्य मुलीच्या वडिलांकडून केले जाते.
प्रत्येकाच्या हौशीनुसार व ऐपतीनुसार हा विधी हल्ली खूप मोठ्या प्रमाणावरही साजरा केला जातो. कित्येकदा हा ‘लघु विवाहसोहळा’च असतो. कार्यालय घेऊन, जेवणावळ घालून वाजतगाजत हा विधी केला जातो. यानंतर प्रत्यक्ष विवाह होईपर्यंत मुलगा मुलगी यांना एकमेकांचा अधिक सहवास घडावा, नीट परिचय व्हावा या उद्देशाने एकमेकांना वारं वार भेटणे थोड्या प्रगतशील पालकवर्गाने मान्य केलेले आहे. प्रत्यक्ष विवाहबद्ध होण्यापूर्वीचा हा ‘फुलपाखरी’ आनंदाचा काळ माणसांच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा काळ म्हणून गणला जातो.
लग्न झाल्याशिवाय कोणताच लग्नमुहूर्त काढला जात नसे. हल्ली मात्र ही प्रथा पूर्णपणे पाळली जात नाही. हल्ली कार्यालयाच्या उ पलब्धतेनुसार लग्नाची तिथी निश्चित होते. निमंत्रण पत्रिका छापल्या जातात. चांगला मुहूर्तपाहून प्रथम आपल्या कुलदैवताला मंगलकार्याला येण्याचे निमंत्रण केले जाते. निमंत्रणपत्रिका देताना तांदूळ व कुंकू एकत्र करून अक्षता तयार करतात व अक्षता आणि सुपारी घेऊन निमंत्रणासाठी वधू / वरांचे आईवडील देवाला जातात. त्यानंतर मित्रमंडळी व नातेवाईक यांना निमंत्रणपत्रिका वाटल्या जातात व विवाहासाठी निमंत्रित केले जाते.
साखरपुड्यापासून ते विवाहाच्या मधील काळात वधूचा पोशाख व दागदागिने यांची तसेच वराचा पोशाख यांची खरेदी केली जाते. ऐपतीनुसार वरपक्षाकडून वधूला वस्त्रे व दागिने खरेदी केले जातात. त्याचप्रमाणे वधूपक्षाकडूनही वरासाठी एखादा दागिना व वरमाई आणि इतर मानापानाच्या साड्या, कापडे इत्यादींची खरेदी केली जाते. या कापडखरेदीला ‘बस्ता बांधणे’ असे नाव आहे.

सर्व साधारणपणे मुंज, विवाह यासारख्या मंगलकार्याच्या आधी घरी ग्रहमख हा विधी करण्याची पद्धत आहे. (वेळेअभा वी ग्रहमखाचा नुसता संकल्प सोडून कार्य झाल्यानंतरही तो करता येतो.) या विधीमध्ये मंगल कार्याला नवग्रहांची अनुकूलता (शांती) मिळविणे हा उद्देश असतो. हा पूर्णतः धार्मिक विधी असतो व लग्नाच्या एक किंवा दोन दिवस आधी घरीच केला जातो. ह्या दि वशीच वधूला चुडा भरण्याची प्रथा आहे. हिरवा चुडा भरल्यावर वधूने घराबाहेर पडायचे नसते. 'केळवण' हा कार्यक्रमही याच दिवशी होतो. केळवण म्हणजे वधू अथवा वराला लग्नाआगोदर दिलेली मेजवानी.

कोणत्याही शुभकार्याला मेंदी लावणे हा खरा | राजस्थानातला रवाज. पण आता तो महाराष्ट्रातही अमाप लोकप्रिय | झाला आहे. मेंदीची पाने वाळवून वाटून केलेल्या पावडरीमध्ये निलगिरीचे तेल घालून ती पाण्यात भिजवून त्याचे कोन तयार करतात. या कोनाच्या सहाय्याने वधूच्या तळहातापासून ते मनगटापर्यंत व हाताच्या पाठीमागच्या भागावरही, तसेच पावलांवर घोट्यापर्यंत नाजुक कलाकुसरीची मेंदी काढली जाते. वधूचे सौंदर्य खुलविण्यासाठी ही मेंदीची प्रथा आहे. मेंदी काढणा-या खास स्त्रिया असतात. तसेच सौंदर्यगृहातूनही अशा प्रकारची सेवा उपलब्ध होते. मेंदीचा कार्यक्रम हा बहुधा लग्नाच्या दोन दिवस आधी केला जातो. वधूबरोबरच लग्नासाठी जमलेल्या व हाडातील स्त्रियांनाही मेंदी काढतात. मेंदी रंगल्यावर वधूला चुडा भरतात. चुडा म्हणजे हिर व्या रंगाच्या साध्या कांचेच्या बांगड्या, त्यावर कोणतेही सोनेरी नक्षीकाम नसते. चुडा भरताना एकेका हातात सात सात किंवा नऊ नऊ बांगड्या घालतात. त्यासाठी लग्नाच्या मंडपात कासारालाच बोलाविण्याची पद्धत आहे. वधूचे चुडा भरणे झाल्यावर व हाडातील इतर स्त्रियांनाही आवडीनुसार हिरव्या बांगड्या भरतात. हिंदूंच्या दृष्टीने हिरव्या बांगड्या व कुंकू हे सौभाग्याचे लक्षण आहे.

 लग्नाच्या सुरुवातीला विधीपूर्वक धान्य कांडणे या विधीला 'घाणा भरणे' असे म्हंटले जाते. हा समारंभ वधूच्या घरी तसेच वराच्या घरीही लग्नाच्या दिवशी साजरा केला जातो. हल्ली हा समारंभ कार्यालयातच होतो. आंब्याच्या पानांनी तसेच हळदीत बुड वलेल्या स्वच्छ चिंधीने किंवा जाड धाग्याने मुसळ सुशोभित केले जाते. पाच सुवासिनी व वधू / वर यांचे मातापिता मिळून उखळात तांदूळ, गहू, तीळ अशाप्रकारचे धान्य घालून कांडतात व कांडताना वधू व वर यांच्या मातापित्यांना उद्देशून मंगल ओव्या म्हणतात. खेडेगावातून, हे कांडलेले धान्य पुन्हा सुशोभित जात्यावर दळून वड्यांच्या पिठात घालण्याची पद्धत आहे. यानंतर घाणा भरणाऱ्या सुवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांची खणानारळाने ओटी भरण्याची पद्धत आहे. घाणा भरून झाल्यावर वधू / वर व तिचे / त्याचे आई वडील यांना पाटा वर बसवून सुवासिक तेल उटणे लावतात. हा विधी लग्नाच्या दि वशीच सकाळी सुरवातीला होतो. या कार्यक्रमापासून सनई चौघडा अशी मंगल वाद्ये वाजविण्याची पद्धत आहे.सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह विवाह हा हिंदूंचा 'संस्कार' आहे, 'करार' नाही. त्यामुळे विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रद्धेचेही बरेच वरचे स्थान आहे. सांस्कृतिक पातळीवर विवाहबंधन हे अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक विधिंबरोबरच एक 'कार्य' या दृष्टीनेही समारंभप्रिय लोक लग्नाकडे खूप हौशीने पहातात. मराठी लग्नाचे मूळ महत्वाचे धार्मिक विधी व त्यामागची विचारपरंपरा यांची माहिती या विभागात दिलेली आहे.

यानंतरचा महत्वाचा विधी म्हणजे हळद लावणे. हा विधीही लग्नाच्या दिवशीच सकाळी करतात. तेल उटणे लावून झाल्यावर वधू व तिचे आई वडील यांना हळद लावतात. हळदीची पूड पाण्यात कालवून ती चेहरा व हातपायांना लावण्याची पद्धत आहे. त्यावेळी प्रसंगानुरूप गाणीही गातात व नंतर त्यांना मंगल स्नान घालतात. त्यानंतर कालवलेल्या हळदीतील उरलेली हळद ( उष्टी हळद) घेऊन पाच सुवासिनी वाजत गाजत वराच्या बिऱ्हाडी जातात. तिथे वराला व त्याच्या आई वडिलांना हळद लावून स्नान घातले जाते. वधूपक्षाकडून हळद घेऊन येणाऱ्या सुवासिनींची खणा नारळाने ओटी भरून, फराळाचे पदार्थ देऊन आदरातिथ्य होते. वरपक्षाकडून वधूला हळदीची म्हणून उंची साडी देण्यात येते.

शेतकरी वर्गामध्ये हळदी समारंभाला फार महत्व आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हा विधी खूप वेळ चालतो व तो आदल्यादिवशीच करतात. यावेळी काही विनोदी, वधु वरांची मस्करी करणारी, किंवा भावनोत्कट अशी गाणी म्हंटली जातात. वधू / वर व तिचे / त्याचे आई वडील यांना मध्ये बसवून त्यांच्याभोवती फेर धरून थोडेसे नाचून गाणी म्हंटली जातात व त्यांना ओवाळतात. आरतीत मुलीचे किंवा मुलाचे आई वडील पैसे घालतात व ते ओवाळणा या सुवासिनींमध्ये वाटून घेतले जातात. हळदीसाठी जमलेल्यांना मटणाचे जेवण देतात. आजकाल लग्न कार्यालयांमधून होत असल्याने तसेच वेळेअभावी आदल्या दिवशी करण्यात येणारे विधी लग्नदिवशी सकाळीच होतात.

पूर्वीच्याकाळी लग्नविधी वधूच्या घरी होत असे. त्यासाठी वर व त्याचे वऱ्हाडी वधूच्या गावी येत असत. वराचे गावाच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी वधूचे आई वडील जात व तिथे त्याचे पूजनही केले जाई. त्या पूजेला 'सीमांत पूजन' असे म्हणतात. हल्ली लग्ने बहुधा कार्यालयातच होत असल्यामुळे हा विधी लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री केला जातो. वधूच्या आई वडिलांकडून वराची पूजा केली जाते व त्याला उंची नवे कपडे दिले जातात. बरमाईचेही पाय धुवून तिला साडी देण्यात येते. 'सीमांतपूजनाचे वेळी वधूला मोठी विवाहित बहीण असल्यास तिच्या पतीचाही सन्मान करण्यात येतो. याला 'ज्येष्ठ जावई पूजन' म्हणतात. त्यानंतर वराचे आई वडील वधूला कुंकू लावून एखादा दागिना देतात व उंची साडी देतात. वधूने ती साडी परिधान करून पुन्हा पूजेच्या जागी यावयाचे असते. वरमाई वधूची पाच फळांनी ओटी भरते. यानंतर रात्रीच्या जेवणाचा समारंभ होतो. काहीजणांकडे यावेळी कढी भाताचे जेवण देण्याची पद्धत आहे.

पूर्वीच्याकाळी लग्नविधी वधूच्या घरी होत असे. त्यासाठी वर व त्याचे वऱ्हाडी वधूच्या गावी येत असत. वराचे गावाच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी वधूचे आई वडील जात व तिथे त्याचे पूजनही केले जाई. त्या पूजेला 'सीमांत पूजन' असे म्हणतात. हल्ली लग्ने बहुधा कार्यालयातच होत असल्यामुळे हा विधी लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री केला जातो. वधूच्या आई वडिलांकडून वराची पूजा केली जाते व त्याला उंची नवे कपडे दिले जातात. बरमाईचेही पाय धुवून तिला साडी देण्यात येते. 'सीमांतपूजनाचे वेळी वधूला मोठी विवाहित बहीण असल्यास तिच्या पतीचाही सन्मान करण्यात येतो. याला 'ज्येष्ठ जावई पूजन' म्हणतात. त्यानंतर वराचे आई वडील वधूला कुंकू लावून एखादा दागिना देतात व उंची साडी देतात. वधूने ती साडी परिधान करून पुन्हा पूजेच्या जागी यावयाचे असते. वरमाई वधूची पाच फळांनी ओटी भरते. यानंतर रात्रीच्या जेवणाचा समारंभ होतो. काहीजणांकडे यावेळी कढी भाताचे जेवण देण्याची पद्धत आहे.

लग्नाच्या दिवशी सर्वप्रथम होणारा धार्मिक विधी म्हणजे 'देवक बसविणे'. वधू आणि वर यांच्याकडे स्वतंत्ररित्या ते बसवले जाते. 'देवक' म्हणजे संरक्षण. पुण्याहवाचनाचा वधी करताना वधूपिता, वधूमाता व वधू पूर्वेकडे तोंड करून बसतात. हाच क्रम मुलाकडेही पाळला जातो.यावेळी देश, काल वगैरे उच्चारून मंत्र म्हणतात व त्याचा उद्देश वधूपिता व वर पिता यांचे देवऋण फिटावे, धर्माज्ञेप्रमाणे वधूवरांनी प्रजोत्पादन केल्याने परमेश्वर संतुष्ट व्हावा असा असतो. देवकासाठी एका सुपात दुहेरी धाग्याचे सूत गुंडाळलेला नारळ ठेवतात. कुलदेवतेचे स्मरण करून अविघ्न कलशाची स्थापना करतात. २७ सुपा यांवर मातृका देवता व आंब्याच्या पानांच्या ६ देवतांनी नन्दिनी आदि देवतांना आवाहन करण्यात येते. लग्नकार्य जिथे होणार तो मंडप संरक्षित व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. एका समिधेला आंब्याची पाने उलटी बांधतात. २७ देवतांची स्थापना तांदूळ, गहू पसरून केली जाते. हे सूप देवापुढे ठेवले जाते. सुपामध्ये अविघ्न कलश म्हणून मातीचे सुगड वापरण्यात येते. मातीचे सुगड का तर आपले जीवन मातीच्या घड्यासारखे आहे याचे ते द्योतक आहे. ते व्यवस्थित हाताळले तर आनंद उ पभोगतो येतो. घड्याशी खेळले तर तो भंग पावेल. देवक स्थापनेपासून देवकोत्थापन करेपर्यंत त्या कार्याशी संबंधित असणाऱ्यांना सोयर सुतक इ. व्यावहारिक नियम लागू होत नाहीत आणि कार्यात बाधा येत नाही. देवक बसते त्याच वेळी घरचे लोक व नाते वाईक, वधू/वर आणि त्यांच्या निकटवर्ती कुटुंबियांना आहेर देतात. याला 'घरचा आहेर' म्हणतात.

लग्नघटिका जवळ आलेली असताना वधू गौरी हराची म्हणजे शंकर पार्वतीची पूजा करते. यासाठी बाळकृष्ण व अन्नपूर्णा यांच्या छोटयाशा मूर्तीची पूजा केली जाते. बाळकृष्ण हे शंकराचे व अन्नपूर्णा हे पार्वतीचे प्रतिक आहे. पूर्वी वधूच्या राहत्या घरातील देवधरात ही पूजा होत असे. हल्ली ती कार्यालयातील एका खोलीत करतात. पूर्वी पूजा मांडण्यासाठी दगडी पाट्याचा वापर होई. पाट्यावर हळदीने गौरीहराची प्रतिमा काढून तांदुळाच्या राशींवर शंकर पा र्वतीच्या (म्हणजेच बाळकृष्ण व अन्नपूर्णेच्या) छोटया मूर्ती ठेवतात. काहींकडे फक्त अन्नपूर्णेचीच चांदीची मूर्ती ठेवतात. एक छोटी तांदुळाची रास, इंद्रपत्नी 'शची' हिचे प्र तीक म्हणून मांडतात. 'इंद्राच्या पत्नीला जसे विवाह भाग्य मिळाले, आरोग्य लाभले व पुत्रप्राप्ती झाली, तसेच मलाही मिळो' अशी प्रार्थना वधू 'शची 'ला, करते. तो श्लोक असा आहे

‘देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्र प्रियभामिनी
विवाहं भाग्यम् आरोग्यम् पुत्रलभंच देही में ‘
नंतर स्नान करून, मामाने लग्नाच्यावेळी नेसण्यासाठी दिलेली ‘अष्टपुत्री’ नावाची पि वळी साडी नेसून वधू गौरीहरापुढे, पूर्वदिशेला तोंड करून बसते व त्यांची मनोमन पूजा करते. संसार सुखाचा व्हावा, पतीबरोबर उत्तम मनोमिलन व्हावे म्हणून ती प्रार्थना करते. एक एक तांदूळ गौरीहराला अगदी सावकाश वाहत ‘गौरी गौरी सौभाग्य दे, दारी अतिथी (वर) येईल त्याला आयुष्य दे’ असे हळूहळू म्हणत राहते. वर लग्नासाठी बोहल्यावर उभा राहिला की वधूचा मामा गौरीहरापाशी येऊन मोठ्या मायेने व गंभीरपणे वधूचा हात धरून तिला विवाहासाठी बोहल्याकडे घेऊन जातो. वधू लग्न झाल्यावर सासरी जाताना माहेरकडून मिळालेली बाळकृष्ण व अन्नपूर्णेची मूर्ती बरोबर घेऊन जाते. या मूर्तीची स्थापना सासरच्या देवघरात केली जाते व सासरच्या घरातील इतर दे वांबरोबर त्यांचीही नेहमी पूजा केली जाते.
वधू ज्यावेळी गौरीहरपूजा करीत असते त्यावेळी वराला व त्याच्या कुटंबियांना रुख वताचे जेवण दिले जाते. नंतर त्याला दूध व केळेही दिले जाते. त्यातील निम्मे दूध व केळे वधूला देण्यात येते.

प्रत्यक्ष लग्न जिथे लागणार त्या जागी दोन लाकडी पाट समोरासमोर (पूर्व व पश्चिम दिशेस) मांडून त्यावर तांदुळाच्या राशी घालतात. त्यावर कुंकवाने स्वस्तिके काढतात. या जागेला लग्नवेदी म्हणतात. एका पाटावर वरास पुष्पहार देऊन उभे करतात. वधूचा मामा वधूस हाताला धरून घेऊन येतो व दुसन्या पाटावर उभे करतो. लग्नाचे वेळी मुलीला मामाने आणण्याचे कारण असे सांगतात मामा हा मायेचा असतो. लग्नकार्याच्या दिवशी मुलीचे आई वडील, काका हे आल्या गेल्याचे स्वागत करण्यात व्यग्र असतात. त्यामानाने मामा मोकळा असतो. शिवाय मुलीला आजोळची ओढ ही जास्त असते. आणि सर्वसाधारणपणे काकापेक्षा मामाच अधिक माया करतो.

वधू वरांच्यामध्ये एक वस्त्र आडवे धरून दोन्हीबाजूला भटजी उभे रहातात. या वस्त्राला अंतरपाट म्हणतात. अंतरपाटाच्या दोन्हीबाजूलाही कुंकवाची स्वस्तिके काढलेली असतात. गुरुजी मंगलाष्टके म्हणावयास सुरू वात करतात. लग्नासाठी जमलेल्यांना रंगीबेरंगी तांदुळाच्या अक्षता वाटतात. मधून मधून, एक मंगलाष्टक संपले की जमलेले सर्व लोक वधू वरांवर अक्षतांचा वर्षाव करतात. वधू वराच्यामागे त्यांच्या त्यांच्या करवल्या हातात करा ( पाण्याने भरलेला कलश त्यामध्ये आंब्याची पाने व कुंकू लावलेला नारळ) व प्रज् वलित दीप घेऊन उभ्या राहतात. लग्नघटिकेच्यावेळी गुरुजी मंगलाष्टके संप वतात. मंगलाष्टकांची सांगता नेहमी खालील श्लोकाने होते.
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तें घ्रीयुगं स्मरामी ||
याचा अर्थ असा की ‘आजच्या दिवशीचे हे लग्न, हा दिवस चांगला आहे, चंद्र व तारांचे बलही चांगले आहे, विद्या व देव यांचेही चांगले बल पाठीशी आहे. परंतु यातील काही जर चांगले नसेल तर, हे महाविष्णू (लक्ष्मीपती) तुमच्या स्मरणाने हे सगळे चांगले होवो ( जी काही उणीव आहे ती तुमच्या नामस्मरणाने भरून काढली जावो.) ‘ ‘शुभमंगल सावधान’ चा दणदणीत गजर होतो. वराचा मामा अंतरपाट दूर करतो. वधू वराला पुष्पमाला घालते आणि वर वधूला पुष्पमाला घालते. वधूवरांनी एकमेकांना हा घातल्यानंतर अक्षतारोपण होते. अक्षतारोपण म्हणजे वधू वरांनी दूध व तुपात भिज वलेली अक्षत परस्परांच्या मस्तकावर टाकणे. त्यावेळी खालील श्लोक म्हंटला जातो.
यज्ञोमे कामः भगोमे कामः |
श्रीयोमे कामः समृध्यताम् ||

याचा अर्थ असा की ‘चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध करताना, यज्ञयागादी कार्य करताना, द्र व्यार्जन करीत असताना कल्याणकारी कार्यक्रम करीत असताना मला तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे. हे विधान वधू व वर या दोघांनीही एकमेकांना उद्देशून म्हणायचे असते.

आता लग्न लागले. मंगल वाद्ये वाजू लागतात. हल्ली बहुदा बड आणविला जातो व बडवर गाणी वाजविली जातात. आता करवल्या आपापल्या हातातील मंगल कलशाचे पाणी वधू वरांच्या डोळ्यांस लावतात. वधूची आई व वराची आई वधू वरांना प्रेमाने ओवाळतात. वधू वरांना आपापल्या जागा बदलून उभे करतात. वधूवरांना शुभेच्छा व भेट देण्यासाठी जमलेल्या लोकांची झुंबड उडते. जमलेल्या पाहुण्यांचे पेढा व गोटा (फुलांचा छोटासा गुच्छ) देऊन स्वागत केले जाते.

हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे व त्यावर आधारित कायद्यानुसार कन्यादान, विवाहहोम व सप्तपदी हे तिन्ही विधी झाल्याशिवाय विवाहविधी पूर्ण झाला असे मानले जात नाही. विवाह सनातन धर्मविधीप्रमाणे झाला की वैदिक पद्धतीने झाला त्यानुसार या विधींचे क्रम मागेपुढे होतात.

शास्त्रोक्तपद्धतीनुसार या तीन विधींपैकी कन्यादान हा विधी प्रथम केला जातो. कन्यादानाच्या विधीच्या आधी वधूच्या मातापित्याकडून वराची ‘मधुपर्क’ पूजा म्हणजे शोडषोपचारे पूजा केली जाते. त्याला सोवळे नेसायला दिले जाते व त्याने ते सोवळे नेसून पुढील विधीसाठी यावयाचे असते. हल्ली सोवळे न देता वराचा खास लग्नासाठी तयार करविलेला पोषाख दिला जातो. धार्मिक विधींसाठी मात्र सोवळे नेसूनच वराला यावे लागते. वधूपिता व माता वधूस शेजारी बसवून घेऊन वरास आपल्या डाव्या हाताकडे किंवा समोर बसवतात. एका मंगल कलशामध्ये पाच रत्ने व सुवर्ण घालून त्यात पाणी घातले जाते. सुवर्ण रत्नांनी अभिमंत्रित केलेल्या कलशातील उदकाने कन्यादान केले जाते. मग एक काशाचे भांडे जमिनीवर ठेवून त्यावर वर वधू व वधूपिता आपापली ओंजळ धरतात. वधूमाता कलशातील पाण्याची संततधार वधूपित्याच्या ओंजळीत धरते. तेथून ती वराच्या, वधूच्या ओंजळीत व नंतर काशाच्या भांड्यात पडते. हे करताना वधूपिता पुढील मंत्र म्हणतो.
धर्मप्रजा सिध्यर्थं कन्यां तुभ्यं संप्रददे |
याचा अर्थ असा की धर्मपालन व उत्तम प्रजा निर्माण करण्यासाठी या कन्येला मी तुमच्या गोत्रात समर्पण करतो. ” त्यानंतर वधूपिता खालील अर्थाचे मंत्र उच्चारतो. “
‘अत्यंत श्रेष्ठ अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती मला व माझ्या सर्व पितरांस होण्याकरता व त्यांची पितृलोकातून मुक्ती होण्यासाठी ही माझी अमुक नावाची अमुक गोत्रोत्पन्न सौभाग्यकांक्षिणी, लक्ष्मीरूपी कन्या मी ह्या विष्णुरूपी वराला ब्राह्मविवाहविधीने अर्पण करतो. हिचा वराने स्वीकार करावा. ‘
असे म्हणून उजव्या हाताने दर्भ, अक्षत व पाणी वराच्या हातावर सोडायचे. त्यावर वराने ‘ओम् स्वस्ति’ म्हणजे ‘मान्य आहे’ असे म्हणायचे. त्यानंतर दानावर दक्षिणा देतातच, त्या न्यायाने कन्यादानावर वरदक्षिणा म्हणून ज्या वस्तू किंवा धन देण्यात येणार असेल त्यांचा मंत्रपूर्वक उच्चार वधूपित्याने करावयाचा. ‘ धर्म, अर्थ व काम या तिन्ही बाबतीत मी पत्नीच्या परवानगीशिवाय कोणतेही अतिक्रमण करणार नाही’ असे वचन वराने वधूपित्याला द्यावयाचे व ‘ धर्म, अर्थ व काम या तिन्ही बाबतीत मी पतीच्या पर वानगीशिवाय कोणतेही अतिक्रमण करणार नाही’ असे वचन वधूनेही आपल्या पित्याला द्यावयाचे असते.
त्यानंतर वधू वरांनी दूध व तुपात भिजवलेली अक्षत परस्परांच्या मस्तकावर टाकून ‘आमचा संसार सुखाचा होवो, आम्हांला उत्तम संतती प्राप्त होवो, उत्तम यश मिळो व हातून सतत धर्माचरण होवो’ असे म्हणायचे असते. साखरपुड्याच्यावेळी, ही धू वरास देण्यासंबंधीचे तोंडी दिलेले वचन, अशा रीतीने वधूपिता शास्त्रोक्त विधीने अग्नि ब्राह्मणांच्या साक्षीने पूर्ण करतो. हा विधी लग्नाच्या इतर सर्व विधींमधील अत्यंत भावविवशतेचा असतो
यानंतरचा विधी म्हणजे मंगलसूत्र बंधन वधू वरांना पूर्वेकडे तोंड करून बसवून वरपक्षाकडील ज्येष्ठ मानाच्या सुवासिनी वधूला कुंकू लावून एक भरजरी त्याचबरोबर साजेशी चोळी, दुसरे एक रेशमी भारी वस्त्र, व मणि मंगळसूत्र देतात. मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांची पोत. (पूर्वी ही सुताच्या धाग्यात ओवत व ती नव-यामुलाच्या उंचीइतकी असे.) त्यात माहेरकडून सोन्याची एक वाटी व दोन मणी आणि सासरकडून सोन्याची एक वाटी व दोन मणी असे वराने काळ्या मण्याच्या पोतीच्या मध्यभागी गुंफायचे असतात. हल्ली मात्र मणीमंगळसूत्र हे काळ्या पोतीसह सोन्यात गुंफलेले असते. मग वधू नवीन दिलेली रेशमी साडी नेसून येते व परत वराशेजारी बसते. वर ते मणी मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधतो व आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून म्हणतो
‘मांगल्य तंतुनानेन ममजीवनहेतुना कंठे बध्नामी | ‘

याचा अर्थ असा की ‘हे पतिव्रते, पतीच्या (म्हणजे माझ्या) जीवनाला कारण असे हे मंगलसूत्र मी तुझ्या गळ्यात बांधतो. तू माझ्यासह शंभर वर्षे सुखाने संसार कर वर हे वाक्य पत्नीला (नववधूला) उद्देशून म्हणतो. ह्यानंतर वधूसाठी सासरहून आणलेले सर्व अलंकार सासरच्या मानकरणी, करवल्या वगैरे तिच्या अंगावर चढवतात व नूतन वि वाहित दांपत्याकडून पुरोहित गणपतीचे पूजन करवितात.

यानंतरचा विधी म्हणजे मंगलसूत्र बंधन. वधू वरांना पूर्वेकडे तोंड करून बसवून वरपक्षाकडील ज्येष्ठ मानाच्या सुवासिनी वधूला कुंकू लावून एक भरजरी त्याचबरोबर साजेशी चोळी, दुसरे एक रेशमी भारी वस्त्र, व मणि ) मंगळसूत्र देतात. मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांची पोत. (पूर्वी ही सुताच्या धाग्यात ओवत व ती नव-यामुलाच्या उंचीइतकी असे.) त्यात माहेरकडून सोन्याची एक वाटी व दोन मणी आणि सासरकडून सोन्याची एक वाटी व दोन मणी असे वराने काळ्या मण्याच्या पोतीच्या मध्यभागी गुंफायचे असतात. हल्ली मात्र मणीमंगळसूत्र हे काळ्या पोतीसह सोन्यात गुंफलेले असते. मग वधू नवीन दिलेली रेशमी साडी नेसून येते व परत वराशेजारी बसते. वर ते मणी मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधतो व आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून म्हणतो

‘मांगल्य तंतुनानेन ममजीवनहेतुना कंठे बध्नामी | ‘
याचा अर्थ असा की ‘हे पतिव्रते, पतीच्या (म्हणजे माझ्या) जीवनाला कारण असे हे मंगलसूत्र मी तुझ्या गळ्यात बांधतो. तू माझ्यासह शंभर वर्षे सुखाने संसार कर’ वर हे वाक्य पत्नीला (नववधूला) उद्देशून म्हणतो. ह्यानंतर वधूसाठी सासरहून आणलेले सर्व अलंकार सासरच्या मानकरणी, करवल्या वगैरे तिच्या अंगावर चढवतात व नूतन वि वाहित दांपत्याकडून पुरोहित गणपतीचे पूजन करवितात.

एक सौभाग्यचिन्ह, सौंदर्यप्रसाधन व पूजाविधीतील एक आवश्यक मंगल पदार्थ. बव्हांशी हिंदू कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया कुंकवाचा वापर करतात. कुंकू कपाळावर लावतात, तसेच केसातील भांगामध्येही घलतात. इतर धर्मांच्या स्त्रियांत कुंकू लावण्याची प्रथा दिसत नाही. कुंकूमम् या संस्कृत शब्दावरून मराठीत कुंकू हा शब्द आला. मूळ शब्दाचा अर्थ 'केशर' असा आहे. कुंकू लावण्याची ही प्रथा केव्हा सुरू झाली हे सांगता येणार नाही, तरी पण जुन्या वाङ्मयातील उल्लेखांवरून ही प्रथा महाभारतकाली अस्तित्वात होती असे दिसते. काहींच्या मते ही प्रथा आर्येतरांकडून उचलली, असे मानतात. इतर काही लोक या प्र ाथेचा संबंध पशुबलीशी लावतात. पशूला मारून त्याच्या रक्ताचा टिळक नववधूस ला वून गृहप्रवेश करण्याची प्रथा एके काळी दक्षिणेतील आर्येतर जातीत होती. या प्रथेचे रूपांतर कालांतराने कुंकू लावण्याच्या प्रथेत झाले असावे.

हिंदू धर्मात आणि हिंदू संस्कृतीत कुंकवाला सौभाग्यचिन्ह म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू स्त्रिया त्यास अहेव लेणे मानतात. देवपूजा, लग्नसमारंभ, मौंजीबंधन इ. वधींत कुंकवाचा वापर आवश्यक व मंगलदायक समजण्यात येतो. मंगल कार्य व दे वपूजेच्या वेळी जोंधळ्यास किंवा तांदूळास कुंकू लावून मंगल अक्षता तयार करण्यात येतात. नव्या वस्त्रास तसेच घरातून बाहेर पडतेवेळी एक सुवासिनी दुसऱ्या सुवासिनीस किंवा परस्परांस मंगलसूचक म्हणून कुंकू लावतात. ओवाळताना व मंगल कार्याच्या प्र संगी पुरूषांनाही कुंकुमतिलक लावतात. लाल कुंकुमतिलक लावण्याने ध्यानधारणा करण्यास आणि चित्त एकाग्र करण्यास सुलभ जाते, असे काही लोक मानतात.

मंगलसूत्रबंधनानंतर लगेच वरानेनवपरिणित वधूसह होम करायचा असतो. तोच वि वाहहोम विवाहहोमाच्या पाच देवता आहेत. त्यांना या होमाने आवाहन केले जाते. वि वाहहोमानंतर केला जातो तो लाजाहोम. लाजाहोमाच्या तीन देवता असतात. या देवतांना आवाहन करून लाजाहोम केला जातो. या होमात लाह्यांची आहुती देतात म्हणून त्याला लाजाहोम म्हणतात. (लाजा म्हणजे लाह्या.)

या होमासाठी वर लग्नवेदीवर ( बोहल्यावर) चढून पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसतो. वधू त्याच्या उजवीकडे पाटावर बसते. समोर स्थंडिल म्हणजे होमपात्र व पाण्याने भरलेला सुशोभित कलश ठेवला जातो. होमपात्राच्या पश्चिमेला पाटा व वरवंटा आणि ईशान्येला साळीच्या ( भाताच्या) लाह्यांची परडी ठेवली जाते. उत्तरेला तांदुळाचे सात पुंजके पूर्वपश्चिम मांडले जातात. नंतर वर समिधा हातात घेऊन स्थलकालाचा उच्चार करून विवाहहोमाचा संकल्प सोडतो.

'हे अग्ने, मी स्वीकारलेल्या या वधूला भार्यात्व यावे व गृहयाग्नी सिद्ध व्हावा म्हणून मी लाजाहोम करतो. तू आम्हांला अन्न दे, बल दे, पुत्र दे, धन दे' असे वर म्हणतो वह प्रज्ज्वलित करतो. होमात तूप टाकून वर 'अग्नये पवमानाय, इदं न मम', असे म्हणतो. गुरुजी यावेळी अग्नीचे व प्रजापतीचे पाच मंत्र म्हणतात.

नंतर वर उठून वधूचा उजवा उताणा हात आपल्या उजव्या हातात घेऊन 'मी तुझे पाणिग्रहण करतो आहे. त्याप्रमाणे भग, अर्यमा, सविता व पूषा या चार देवांनी गृहस्थाश्रमाकरता आपणांस एकत्र आणले आहे' असे म्हणतो.

नंतर वर आपल्या आसनावर पूर्ववत बसतो. वधू ताम्हनात दोन्ही हात स्वच्छ धुते व पाटावर उभी राहून दोन हातांची ओंजळ करते. त्या ओंजळीत थोडे तूप व वधूच्या भा वाकरवी दोन वेळा एकएक मूठ लाह्या टाकतात. वर ओंजळीतील लाह्यांवर तुपाने एक वेळ धार धरतो व पुढील वाक्य म्हणतो, ‘देदिप्यमान अर्यमा तुला मातृकुलातून मुक्त करून माझ्या कुलात समरस होण्याची प्रेरणा देवो.’ असे म्हणून आपल्या दोन्ही हातांनी वधूची ओंजळ तिरकी करून सर्व लाह्या होमात पडतील असे करतो. वधूच्या ओंजळीत लाह्या टाकणा-या भावाला टोपी देऊन त्याचा मान करतात. याचवेळी वराचा कान पिरगाळून ‘माझ्या बहिणीची नीट काळजी घे’ असे वधूचा भाऊ वराला बजावतो. याला ‘कानपिळी’ चा विधी म्हणतात. कानपिळीबद्दल वराने भावाला काही बक्षीस देण्याची पद्धत आहे.

अग्निप्रदक्षिणा हा स्वतंत्र विधी नसून लाजाहोमाचाच पुढील व मुख्य भाग आहे. होमासाठी वर व वधू वि वाहवेदीवर बसतात त्यावेळी पुढे स्थंडिल म्हणजे होमपात्र व पाण्याने भरलेला आणि आह्ह्व्यापल्लव, फुले आदींनी सुशोभित केलेला कलश असतो. त्यांतील उदक उपाध्यायांनीमंत्र म्हणून पवित्र केलेले असते. सर्व लाह्या धगधगत्या होमकुंडात पडल्यानंतर वर उठून उभा राहतो व होमकुंड आणि उदक कलश यांना म्हणजेच अग्नीला प्रदक्षिणा घालतो. तो वधूचा हात आपल्या हातात घेऊन पुढे चालतो. वधू त्याचा हात धरून त्याच्या मागे चालते. प्रदक्षिणा पुरी झाल्यावर वधू होमकुंडाच्या पश्चिमेस ठेवलेल्या पाट्यावर ( किंवा सहाणेवर) पाय ठेवून उभी राहते. वर मंत्र म्हणतो, 'हे वधू, तू या पाषाणाप्रमाणे दृढ (घट्ट) हो. आपल्या हितशत्रूंचा सद्वर्तनाने नाश कर.' (मैत्रीपूर्ण सोज् वळ वागणुकीने शत्रूंनापण जिंकून घे असा भावार्थ. )

हा अग्निप्रदक्षिणेचा संपूर्ण विधी तीन वेळा करतात. म्हणजेच मग अग्निब्राह्मणांच्या साक्षीने वधू वरांचे लग्न लागले असे ती उभयता व उपस्थित इतरेजन मानतात. इतका हा महत्वाचा विधी आहे.

लाजाहोमानंतरचा विधी म्हणजे सप्तपदी. होमाच्या उत्तरेकडे मांडलेल्या तांदुळाच्या सात राशीं वरून वराने वधूला चालवायचे असते. एकेका राशीवर एकेक पाऊल व तेही उजवे पाऊल ठेवायचे. ही सात पावले म्हणजेच सप्तपदी. प्रत्येक पाऊल ठेवल्यावर वर पुढील मंत्र किंवा त्या अर्थाचे वाक्य म्हणतो.

पहिले पाऊल - हे वधू, तुझे-माझे सख्य झाले आहे. तू अन्नदात्री व दीर्घायू संततीची माता हो.

दुसरे पाऊल - हे वधू, तू दोन पावले चालली आहेस म्हणून मला बलवर्धक हो.

तिसरे पाऊल - हे वधू, तू तीन पावले चाललीस, आता मला धन देणारी हो.

चवथे पाऊल - हे वधू, चार पावले चाललीस, आता माझी सुखबर्धिनी हो.

पाचवे पाऊल - हे बधू, तू पाच पावले चाललीस, आता संततिवर्धक हो.

सहावे पाऊल -हे वधू, तू सहा पावले चाललीस म्हणून सहाही ऋतूंत प्राप्त होणारे भोग देणारी हो.

सातवे पाऊल - हे वधू, तू सात पावले (माझ्याबरोबर) चालली आहेस. यास्तव माझी दृढ सखी हो..

सप्तपदी झाल्यानंतर वर वधूच्या मस्तकाचा आपल्या मस्तकाला स्पर्श करतो आणि मंगल कलशातील उदक आपल्या व वधूच्या मस्तकी लावतो. शांती असो, तुष्टी असो, पुष्टी असो असे म्हणतो. यानंतर वधूच्या पायात चांदीची जोडवी घातली जातात. त्यावेळी करवलीने वधूच्या पायाचा अंगठा हाताने दाबायचा असतो. सप्तपदी झाली की शास्त्रोक्त विवाहविधी पूर्ण झाला.

यानंतर विवाहानिमित्त जमलेल्या सर्व पाहुण्यांना मिष्टान्न भोजन व त्यानंतर विडे दिले जातात. वधू वर आणि वरमाई आणि वराचे वडील, बहीण, भाऊ इत्यादींची खाशी पंगत बसते. त्या वेळी वधूने बराला व वराने वधूला घास देण्याची पद्धत आहे. पूर्वीच्याकाळी स्त्रियांनी आपल्या पतीचे नाव उच्चारण्याची पद्धत नव्हती. परंतु लग्नामध्ये मात्र विविधप्रसंगी पतीचे नाव अर्थपूर्ण अशा दोन किंवा चार ओळींच्या उखाण्यात गुंफून घेण्याची प्रथा होती. आजलाही ही प्रथा पाळली जाते. घास देताना वधू वर असे उखाणे रचून वधू वराचे व वर वधूचे नाव त्या गुंफतो. यावेळी आसपासची तरूणमंडळी वधूवरांची चेष्टा मस्करीही करतात.

वरमाई जेवायला बसलेल्या पंगतीला ‘विहिणींची पंगत म्हणतात. विहिणीच्या पंगतीच्यावेळी वधूची आई अथवा वधूची आत्या किंवा काकू किंवा मावशी एक गाणे म्हणते. त्याला ‘विहीण’ असे म्हणतात. या विहिणीमध्ये विहीण म्हणणारी स्त्री वरमाईला अशी विनंती करीत असते की ‘आम्ही आमची मुलगी तुमच्या मुलाला दिलेली आहे. तिचा नीट सांभाळ करावा. ‘ ही विहीण म्हणतानाच लग्नाचा आतापर्यंत चाललेला आनंद व उत्साहाचा भाग थोडा थोडा भावनाप्रधान होऊ लागतो. विहिणीचे जेवण संपल्यावर वरमाईला वधूच्या आईकडून चांदीच्या लवंगा व चांदीचा कार्ल्याचा वेल दिला जातो.

एका वेताच्या मोठ्या टोपलीत कणकेचे हळद घालून केलेले दिवे ठेवतात. त्यात तेल, वाती घालून ते पेटवितात. त्याला झाल म्हणतात. नंतर गुरुजी काही मंत्र म्हणून वराच्या वडीलधा या मंडळीना बोलावितात. वधूचे आई वडील वराचे आई वडील, काका, मामा, आजोबा वगैरे ज्येष्ठ व्यक्तींच्या डोक्यावर झाल धरतात व सर्वांच्या साक्षीने आमची मुलगी तुमच्या घरात दिलेली आहे. तिची जबाबदारी आता तुमची आहे असे सांगतात. यानंतर वधू सासरी जाण्यास निघते. हा प्रसंग सर्वात भावनाप्रधान असतो. जन्म देऊन लाडाकोडाने वाढविलेली लाडकी मुलगी आपल्याला कायमची अंतरणार या कल्पनेने वधूच्या माता पित्यांचा कंठ दाटून येतो. वधूपक्षातील सर्वच नातेवाइकांचे विशेषतः स्त्रीवर्गाचे डोळे पाणावतात. वधूही माता पित्यांना कायमचे सोडून जाण्याच्या कल्पनेने कमालीची भावविवश होते. साश्रुनयनांनी सर्वांचा निरोप घेऊन ती पतीगृही जाण्यास निघते. जाण्याआधी वधूची मालत्यांनी ओटी भरतात व गौरीहर पूजेत ज्या बाळकृष्णाची व अन्नपूर्णेच्या मूर्तीची तिने पूजा केलेली असते त्या मूर्तीही तिला सासरी नेण्यासाठी दिल्या जातात.

घरात येणा या नववधूला हिंदुधर्मानुसार लक्ष्मी मानले जाते. त्यामुळे वराच्या घरी तिचे अत्यंत उत्साहाने व आदराने स्वागत होते. वधू वरासह व हाडातील इतर स • र्व मंडळी वरगृही आली की वधूवरांवरून दहीभात ओ वाळून त्यांची दृष्ट काढतात. प्रवेशद्वाराच्या उंब याजवळ तांदूळ भरून एक माप ठेवलेले असते. नववधूने ते आपल्या उजव्या पायाने लवंडून देऊन मग आत जावे अशी पद्धत आहे. त्यामागे कल्पना अशी की' हे वधू, लक्ष्मीच्या रूपाने तू या घरात आलीस. धान्याच्या रूपाने या घरात तू समृद्ध हो, हे घर समृद्ध कर.' मग त्या जोडप्यास देवघरात नेऊन देवाच्या पाया पडवितात. घरातील वडील मंडळींच्या पाया पडवितात व वधूस घरातील कोणास अगदी लहान मुलांसह काय हाक मारायची वगैरे सांगतात. मग दोघांकडून लक्ष्मीपूजन करवितात व नवरीचे नाव बदलून दुसरे ठेवायचे असल्यास ह्याच वेळी ठेवतात. ताम्हनात तांदुळाची रास घेऊन सोन्याच्या अंगठीने वर ते नाव लिहितो. उपस्थित मंडळींस साखर वाटून नवीन नाव सांगतात.

या वेळी उपाध्येबुवा हजर असल्यास ते व इतर वडील मंडळी उत्तमोत्तम आशिर्वाद देतात. ते म्हणजे ‘अखंड सौभाग्यवती भव’, ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ वगैरे वगैरे. नंतर वरपक्षीयांनी वधूपक्षीयांचे मानपान करून त्यांची पाठवणी करायची असते.

सासूने सुनेचे मुखानलोकन करण्याचा हा विधी आहे. हिंदू धर्मात कोणत्या मांडीवर कोणी बसा वे याचे विवेचन आहे. उजवी मांडी ही अपत्यासाठी असते. घरात नव्याने आलेली सून हे अपत्य म्हणून सासूने स्वीकारायचे असते. यावेळी सासूच्या एका मांडीवर सुनेला बसवितात आणि एका मांडीवर मुलाला बसवितात. सासू दोघांचेही काहीतरी गोड पदार्थ मुखात घालून आनंद दर्शविते. त्यानंतर सासूने आरशात सुनेचे मुखावलोकन करायचे असते. तिला आरशात पहाण्याचे कारण म्हणजे अलंकृत केलेल्या मुलीच्या रूपाला दृष्ट लागण्याची शक्यता असते, परंतु प्रतिबिंबाला दृष्ट लागत नाही. याचवेळी सासूने पूर्णतः नव्या वातावरणात व घरा माणसात आलेल्या सुनेला आपल्या नजरेतून धीर द्यायचा अशी पद्धत आहे. आता सुनेला आईची माया देण्याची जबाबदारी सासूवर आली असाही याचा अर्थ आहे.

हा कार्यक्रम संपला की लग्नाचा सर्व कार्यक्रम पार पडला.
यानंतर वधू कायमची वराच्या घरी म्हणजेच सासरी रहावयास येते.

अनेकांनी लिहीली काव्ये गायली
सौंदर्याची महती काल होते युवती
आज झाले .... ची सौभाग्यवती

झाले लक्ष्मीपूजन कृपा असो लक्ष्मीची
…. आणि …. सुखी राहो हीच आस मनीची.
रूसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास
…. ला भरवतो मी जिलबीचा घास.
जाई जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास
… ला देते मी. ***** चा घास.
दत्ताच्या देवळात धुपाचा वास
… ला भरवतो मी लाडूचा घास.
गाण्याच्या भेंड्यांचा मूड आहे खास
… ला भरवतो मी जिलबीचा / लाडूचा घास.
सुखाचा होतोय इतका वर्षाव सत्य नव्हे की हा आहे
हा भास सत्यप्रचितीसाठी भरवते … ला … चा घास.
सुखाचा होतोय इतका वर्षाव सत्य नव्हे की हा आहे
हा भास सत्यप्रचितीसाठी भरवते … ला … चा घास.
पंगतीत दरवळतो उदबत्तीचा सुवास
… ना भरवते मी … चा घास.
दवबिंदूत होतो सप्तरंगाचा भास
… ना भरवते मी … चा घास.
उटी, बंगलोर, म्हैसूर म्हणशील तेथे जाऊ
.. तुला घास भरवतो पण बोट नको चाऊ. ….
जाई जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास
… ला देते मी. … चा घास.
भाद्रपद महिन्यात गणपती बसवतात शाडूचा
… ला घास देतो / देते लाडूचा.
कृष्ण कन्हैयाला लागला राधेचा ध्यास
… ना भरवते मी …. चा घास.
भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
…. ला घास देते पंगत बसली मित्रांची.
सर्वांच्या आग्रहाखातर भरवते पुरी श्रीखंड
… च्या साठी मी सोडून चालले आशियाखंड.
सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले
… चे नाव घ्यायला सर्वांनी अडवले.
महादेवाच्या पिंडीवर बेल बहाते वाकून
… चं नाव घेते सर्वांचा मान राखून.
पेटी वाजे वीणा वाजे सतार वाजे छान
… चं नाव घेते सर्वांचा राखून मान.
श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य
… आणि माझ्या संसारात होईल तुमचे आदरातिथ्य
सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान
… चं नाव घेते सर्वांचा राखून मान.
शंकराची पूजा करते पार्वती खाली वाकून
… चं नाव घेते सर्वांचा मान राखून.
राम गेले वनात, राज्य दिले भरता
… चं नाव घेते सर्वांच्या करिता.
माहेरचे निरांजन सासरची बात
… चे नाव घेऊन करते संसाराला सुरूवात.
सडारांगोळीने सुशोभित केले आहे. अंगण चं
… नाव घेऊन सोडते मी कंकण.
निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान
… चं नाव घेते सर्वांचा राखून मान.
पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता
… चं नाव घेते तुम्हाकरिता
मंगळसूत्राच्या दोन वाटया सासर आणि माहेर
… नी दिला सौभाग्याचा आहेर.
आई वडिल आहेत प्रेमळ, सासू सासरे आहेत
… हौशी चे नाव घेते लग्नाच्या दिवशी
शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी
… चं नाव घेते बारशाच्या दिवशी.
मावळला सूर्य उगवला शशी
… चं नाव घेते … च्या दिवशी
शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज
… चं नाव घेते गौर बसली आज.
गौरीपुढे हळदी कुंकवाच्या राशी
… चं नाव घेते चैत्रमासी.
हिरवं लिंबू गारसं
… रावांच्या बाळाचं आज बारस
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी
… चं नाव घेते … च्या बारशाच्या दिवशी.
कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी कुंकवाच्या राशी
… चं नाव घेते … च्या बारशाच्या दिवशी.
नीलवर्ण आकाशात चमकतो शशी
… चं नाव घेते … च्या बारशाच्या दिवशी
बनारसी शालूला आहेत जरतारी काठ
… च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.
नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण
… चं नाव घेते बारशाचं कारण.
दशरथ राजानं केला पुत्रासाठी नवस
आज … च्या मुलाच्या बारशाचा दिवस.
सासूबाई आहेत प्रेमळ वन्स आहेत हौशी
… चं नाव घेते डोहाळेजेवणाच्या दिवशी.
चांदीच्या वाटीत रूपये ठेवले साठ
… चं नाव घेते केला डोहाळेजेवणाचा थाट.
चांदीच्या भांड्यांना असावा नाशिकचा घाट
…. चं नाव घेते …. च्या डोहाळेजेवणाचा थाट.
एका वाफ्यातली तुळस दुसऱ्या वाफ्यात रूजवली
… ची सारी माणसे मी आपली मानली
भाजीत भाजी मेथीची
… माझ्या प्रितीची.
जीवनात ही घडी अशीच राहू दे
… ची प्रीत सदैव अशीच फुलू दे.
हरिश्चंद्र राजा, तारामती राणी, रोहिदास पुत्र
… च्या नावाचे घातले मंगळसूत्र.
शिवाजीला जन्म देणारी धन्य जिजाऊमाता
… रावांचं नाव घेते आपल्या शब्दाकरिता.