Shreeganesh Sabhagruha

|| श्रीगणेश सभागृह ||

श्रीगणेश सभागृह हे १९९४ मध्ये गोखले बंधू यांनी पुणे येथे स्थापन केले आणि त्याच बरोबर एक भव्य हॉल मंगल कार्यासाठी नावारूपाला आला. काही वर्षातच हॉलची लोकप्रियता वाढली ती त्याच्या वेगळ्या वैशिष्ठ्यांमुळे. येथे तुम्हाला १८००० स्क्वे.फू.मध्ये दोन भव्य हॉल, त्याच्या दोन्ही बाजूला दोन मोठी लॉन्स, वधू व वर यांच्यासाठी प्र त्येकी २ प्रशस्थ खोल्या, सेफ्टी लॉकर्स त्याला जोडूनच टॉयलेट बाथरूमची सोय आणि हे सर्व तळमजल्यावर उ पलब्ध होते, म्हणजेच तुमच्या आनंदमयी समारंभाचे ‘वन रूफ सोलूशन’. सभागृहाच्या याच वैशिष्ठ्यांमुळे आता ते पुण्यातील एक नामांकित मंगल कार्यालय म्हणून ओळखले जाते. सर्व प्रकारच्या समारंभांसाठी योग्य असा हॉल व येथील स्वस्त दर तुम्हाला तुमच्या आनंदाच्या क्षणी सुखावून जातात.